हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 6 रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे.
सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 137 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 6 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. सातारा जिल्ह्याचा सध्या कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट हा 4. 38 टक्के इतका खाली आला आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या हि वाढत आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणचे केवळ 31 रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 99 टक्के नागरिकांनी पहिला, 80 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेच आहे तसेच केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.