व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली; 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता (Video)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भिवंडी येथील वळपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. दुपारी 12 वाजता ही इमारत कोसळली आहे. यामध्ये सुमारे 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

खाली ग्राउंड आणि त्यावर 2 मजली इमारत असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुमारे 3 ते 4 कुटुंबे राहतात. तर खालच्या मजल्यावर कामगार काम करत होते. हे सर्व लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या त्याठिकाणी अग्निशमन दल, एनडीआरएफच्या तुकडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.