सातारा जिल्ह्यातून 6 जण एक वर्षाकरिता तडीपार : कराड तालुक्यातील 4 जणांचा समावेश

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा तालुका, सातारा शहर, शाहूपुरी, तसेच उंब्रज पोलिस ठाण्‍यांच्‍या हद्दीत गंभीर गुन्‍हे करत सामाजिक शांतता धोक्‍यात आणणाऱ्या सहाजणांना एका वर्षाकरिता सातारा जिल्ह्यासह लगतच्‍या भागातून तडीपार केले आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल यांनी दिले आहेत.

समीर समील कच्‍छी (रा. जगदिश्‍‍वर कॉलनी, मोळाचा ओढा), अक्षय अनिल तळेकर (रा. हरपळवाडी, ता. कराड) आणि शुभम उद्धव इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) यांच्‍यावर शाहूपुरी, सातारा शहर, तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात अनेक गुन्‍हे नोंद आहेत. या गुन्ह्यांची दखल घेत त्‍यांना तडीपार करण्‍याचा प्रस्‍ताव सहा‍यक पोलिस निरीक्षक ए. एस. चौधरी यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल यांच्‍याकडे सादर केला होता. यानुसार श्री. बन्‍सल यांनी तिघांना सातारा जिल्‍ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्‍यात आले आहे.

उंब्रज पोलिस ठाण्‍यात सूरज ऊर्फ अर्जुन मारुती धस (रा. माळवाडी – मसूर, ता. कराड), नितीन चंद्रकांत जाधव (रा. मसूर), अजय शरद जाधव (रा. मसूर) यांच्‍याविरोधात गुन्‍हे नोंद आहेत. या तिघांना तडीपार करण्‍यासाठीचा प्रस्‍ताव उंब्रजचे सहायक निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल यांच्‍याकडे सादर केला होता. यानुसार या तिघांना श्री. बन्‍सल यांनी सातारा जिल्‍हा, तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, वाळवा, शिराळा या तालुक्‍यातून तडीपार केले आहे.