बाप रे ! महिलेच्या डोळ्यात सापडल्या चक्क 60 जिवंत आळ्या; डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण सोशल मीडियावर रोज काही ना काही नवीन घटना वाचत असतो पाहत असतो. या घटना पाहून अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्का देखील बसतो. आणि असाच एक आश्चर्याचा धक्का बसणारा प्रकार बुलढाणामध्ये घडलेला आहे. बुलढाणातील एका महिलेच्या डोळ्यांमध्ये तब्बल साठ जिवंत आळ्या आढळून आलेल्या आहेत. आणि हे बघितल्यानंतर डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसलेला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावात हा सगळा प्रकार घडवून आलेला आहे. येथील मोरवाल या रुग्णालयात या महिलेवर उपचार चालू आहेत. आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा डोळा वाचला आहे. ही महिला चिखलीतील मालगणी येथील रहिवासी आहे. तिचे नाव ज्योती गायकवाड असे आहे. यावेळी डॉक्टरांनी केवळ दीड तासांमध्ये त्या महिलेच्या डोळ्यातून 60 आळ्या बाहेर काढलेल्या आहे. मोरवाल हॉस्पिटलच्या या डॉक्टरचे नाव डॉक्टर स्वप्नील मोरवाल असे आहे. त्यांनी या गरीब महिलाकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाही. ही महिला मजुरी करून पोट भरत असते. परंतु काम करताना दुखापत झाल्याने तिच्या डोळ्यांमध्ये आळ्या झाल्या होत्या.

डोळा दुखत असल्याने ती डॉक्टरांकडे तपासण्यासाठी आली. परंतु डॉक्टरांना हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर जवळपास दीड ते दोन तास या महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया चालू होती. आणि त्यानंतर तिचा डोळा वाचलेला आहे. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक त्या महिलेच्या डोळ्याची शस्त्र क्रिया केली आहे. आणि त्यानंतर तिचा डोळा वाचला आहे. या डॉक्टरांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलेच्या डोळ्या आधीपासूनच दुखत होता. परंतु पैशाच्या अभावी आणि काम करायचे असल्याने तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर तिचा तो त्रास जास्तच वाढत गेला आणि तिने मोरवाल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टरांच्या जे निदर्शनास आले ते पाहून त्यांना स्वतःलाच खूप धक्का बसला. त्यानंतर त्या डॉक्टर त्यांनी एकही रुपयांना न घेता त्या गरीब महिलेचा डोळा वाचवला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.