60 टक्के लोक सोडणार मुंबई? काय आहे यामागील कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) म्हंटल की आपल्याला आठवते ती स्वप्ननगरी. जिथे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे लोक एक स्वप्न उराशी घेऊन जातात आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी धडपडतात. अनेकजण नोकरीं मिळावी आणि आपण मुंबईत कायमचे राहायला जावे असे स्वप्न घेऊन येतात. परंतु तुम्हाला जर सांगितलं की हे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेले लोक मुंबई सोडून जाण्याच्या विचारात आहेत तर? तर हे खरयं. यामागील नेमकी कारणे कोणती आहेत ते सुद्धा आज आपण जाणून घेऊयात.

60 टक्के लोक सोडू इच्छितात मुंबई

मुंबईत जरी सर्व्ह सुख सोयी मिळत असल्या तरी मुंबईचे वातावरण सध्या बिघडले आहे. त्यामुळे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यातील सर्वात मोठी अडचण बनलीये वाढते प्रदूषण. होय, मुंबईची अवस्था सध्या दिल्ली सारखी झाली असून त्यामुळे तब्बल 60% नागरिक स्वप्ननगरी सोडण्याच्या विचारात आहेत. यामध्ये असे लक्षात आले आहे की, 10 पैकी 6 नागरिक हे स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.

प्रदूषणामुळे सोडतायेत लोक मुंबई

मुंबई म्हणजे असे शहर जिथे ना दिवस असतो ना रात्र. मुंबईत 24 तास सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकांना मुंबईला जाण्याचे आकर्षण असते. मात्र सध्या मुंबई प्रदूषणाने ग्रासलेली आहे. त्यामुळे लोकांच्या शरीरावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्यांची संख्या आता कमी होणार की काय अशी भीती लागून आहे. कारण अनेकजण हे शहर सोडण्याच्या विचारात आहेत. असे एक सर्वेतून समोर आले आहे. दिल्ली मध्ये देखील हीच अवस्था झाली आहे.

प्रदूषणामुळे लोकांना होतायेत आजार

मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाचा त्रास, खोकला, जीव घाबरा होणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या सतावू लागल्या आहेत. अस्थमाच्या रुग्णामध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. मागच्या अनेक दिवसापासून मुंबईच्या प्रदूषणाबाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. मात्र आता या कारणामुळे नागरिक मुंबई सोडण्याच्या विचारात असल्यामुळे खरच मुंबई अर्ध्याहून अधिक रिकामी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. आणि त्यामुळे ज्या शहराने आसरा दिला आता त्याच शहराने आसरा काढून घेतला असे लोक बोलताना दिसून येत आहेत.