आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून अल्पसंख्याक समाजासाठी 65 लाखांचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 3 कोटी 10 लाख रुपयाचा कराड दक्षिण अल्पसंख्यांक समाजासाठी निधी मागितला होता. त्यापैकी 65 लाख रुपये निधी आमदार फंडातून दिला आहे. उर्वरीत 2 कोटी 60 लाख रुपयेच्या निधीसाठी पृथ्वीराज चव्हाण बाबा यानी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. 2022/23 च्या बजेटमध्ये तो ही मंजूर होईल असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

कराड येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने दरवेशी वसाहत येथील बंदिस्त गटर, मुजावर कॉलनी येथील आर. सी. सी. रस्ता, विठ्ठलनगर येथील आर. सी. सी रस्ता या कामांचा समावेश आहे. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण यांनी दिली. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते साबीर मिया मुल्ला, नगरसेवक इंद्रजित गुजर, रमेश वायदंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, उपाध्यक्ष भास्कर देवकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप जाधव, सातारा जिल्हा काँग्रेस सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आमिर मुजावर,  युवा नेते आमिर कटापुरे, रमजान कागदी, नईम पठाण, सोहेल पठाण, निसार शेख, मोहम्मद शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा जिल्हा काँग्रस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण यांच्या प्रयत्नातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार फंडातून 50 लक्ष रूपये, मुस्लीम वस्ती मधील रस्ते व आर. सी. सी गटार कामासाठी मंजूर केले. त्या कामाचे शुभारंभ करण्यात आला.

Leave a Comment