मैत्री पडली महागात ! 13 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून सामूहिक बलात्कार

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रांची : वृत्तसंस्था – रांचीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एखाद्या मित्रावर अंधपणानं विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा प्रत्यय आला आहे. यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या जीवलग मित्रानं दगा दिला आहे. आरोपी तरुणानं पीडितेला खोटं बोलून एका निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला आहे. यानंतर आरोपींनी अपरात्री पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे तर तीन जणांचा शोध अजून सुरु आहे.

हि घटना रांचीमधील एका गावामधील आहे. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, तिने गुरुवारी गावातील एका मित्रासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता. या प्लॅननुसार ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला गेली. पण तिच्या मित्रानं तिला एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं. जिथे आरोपी मित्राचे अन्य सहा मित्र आधीपासूनच उपस्थित होते. याठिकाणी गेल्यानंतर पीडित मुलगी घाबरली. तिने आपल्या मित्राला त्वरित घरी सोडायला सांगितलं. पण मित्रानं तिला रोखून ठेवलं. यावेळी पीडितेने घरी जाण्यासाठी आपल्या मित्राकडे अनेकदा विनंती केली. पण मित्रानं काही ऐकलं नाही.

मित्राने पीडितेला सांगितले कि, आम्हाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. हे ऐकून पीडित मुलीनं पळायला सुरुवात केली. पण आरोपी मित्राच्या अन्य सहा साथीदारांनी तिला पकडलं. यानंतर सातही आरोपीनं संपूर्ण रात्रभर 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केला आहे. यानंतर आरोपींनी रात्री उशीरा पीडित मुलीला तिच्या एका मैत्रिणीच्या घरी सोडलं आणि त्याठिकाणाहून पसार झाले. मैत्रिणीच्या घरी संपूर्ण रात्र घालवल्यानंतर पीडित मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी गेली. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. यानंतर नातेवाईकांनी मांडर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून चार जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here