कराडला कुत्र्याच्या हल्ल्यात 7 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडच्या शिक्षक कॉलनीत काल दहा वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी केलेला हल्ला होता. कालची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सूर्यवंशी मळा परिसरात एका सात वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यास तातडीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सूर्यवंशी मळा, शिक्षक कॉलनी परिसरात नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिक्षक कॉलनी येथे काल दहा वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. त्या मुलीच्या पायावर सात ते आठ ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला होता. आज पुन्हा सूर्यवंशी मळा येथील आदर्श काॅलनीत विराज सचिन तूपे या सात वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या पोटावर, पाटीवर व पायावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. या घटनेने सूर्यवंशी मळा शिक्षक कॉलनी परिसरात नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

सध्या कराड शहरात ॲनिमल प्रोटेक्शन क्लबच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरीही शहरात व शहर परिसरातील वाढीव भागात भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या असल्याने नगरपरिषद प्रशासनाने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. वाढीव भागात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढू लागल्याने या परिसरातील नागरिक आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

भटक्या कुत्र्यांचे हे टोळके असून यामध्ये 25 ते 30 कुत्री आहेत. ती अतिशय क्रूर झालेली आहेत. शेतातून फिरत आहेत. वाखान परिसर ते शिक्षक कॉलनी या दरम्यान ही कुत्री फिरत असतात. रस्त्यावरील माणसांच्या व लहान मुलांच्या अंगावर धावून जात आहेत. वाखान रस्त्यावरुन बहूतांशी मूले सायकल व चालत जनकल्याण शाळेत जात असतात. त्यामुळे नगरपरिषदने या परिसरातील कूत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.