अक्कलकोट : हॅलो महाराष्ट्र – अक्कलकोट मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका ७ वर्षीय मुलीचा गळफास लागून मृत्यू झाला आहे. या अकस्मात मृत्यूची उत्तर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मुलीचे वडील डॉ. शिवपुत्र काशीराम गुरव यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण
मृत मुलीचे नाव अभिलाषा शिवपुत्र गुरव असे आहे. मुलीचे आई वडील रविवारी सकाळी नऊ वाजता काही कामानिमित्त गावामध्ये गेले होते तेव्हा घरी अभिलाषा आणि तिचा भाऊ निरंजन खेळत होते. त्यानंतर मुलीचे आईवडील जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना बेडरूमचा दरवाजा बंद दिसला. त्यानंतर आईने दोन्ही मुलांना हाका मारल्या पण त्यांनी कोणी प्रतिसाद नाही दिला. त्यानंतर त्यांनी खिडकीतून आतमध्ये पहिले असता मुलगी अभिलाषा ही बेडरूममध्ये साडीने बांधलेल्या झोक्याला लटकलेली दिसली.
त्यानंतर आई वडिलांनी बेडरूमचा दरवाजा तोडला व आत गेले असता अभिलाषा ही साडीने बांधलेल्या झोक्यावर झोका खेळत असताना गळफास लागून बेशुद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच तिला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता नेण्यात आले पण तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.