पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्याजवळील मांजरी या ठिकाणी काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 7 वर्षीय पुतणीला आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. हा नराधम काका गोड बोलून मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारेल, अशी धमकीसुद्दा या नराधम काकाने पीडित मुलीला दिली होती. यानंतर घाबरून पीडित मुलीने या घटनेची कुठेच वाच्यता केली नव्हती.
पण अलीकडेच आरोपीनं पीडित मुलीचं लैंगिक शोषण केल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. पीडित मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या दीराविरोधात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो कलमासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी नराधम काकाला अटक केली आहे.पीडित मुलगी हि पुण्याजवळील मांजरी येथील एका सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहते. आरोपी काकाने 7 वर्षीय पीडित मुलीला गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
आरोपीनं पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. यावेळी नराधम काकाने या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारेल, अशी धमकीसुद्दा पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी नराधम काकाचा लैंगिक अत्याचार निमूटपणे सहन करत होती. काही दिवसांनी पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी काकाला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.