सातारा | विवाहितेचा जाचहाट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला 7 वर्षांची शिक्षा न्यायाधिश एस. आर. सालकुटे यांनी ठोठावली. रोहित भास्कर घाडगे (वय- 23, रा. जिंती ता. फलटण) असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर दिपाली रोहित घाडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिपालीचा भाऊ श्रीनाथ संपत माने (वय- 21, रा. पिंपळवाडी ता. फलटण) यांनी फलटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
याबाबत अधिकची माहिती अशी, दि. 7 ऑगस्ट 2018 ते 28 आक्टोबर 2018 या कालावधीत सौ. दिपाली हिला तिच्या सासरच्या मंडळींनी छळ करुन मानसिक जाचहाट त्रास देत जाचहाट केला. या सर्व त्रासाला कंटाळून दिपालीने आत्महत्या केली. यावरुन तिच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास तत्कालीन सपोनि पी. पी. नागटिळक यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. या खटल्यात 2 साक्षीदार तपासण्यात आले. प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस शमशुद्दीन माहिती शेख, गजानन फरांदे, मंजूर मणेर, रहिनाबी शख राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.