गंगा नदी पाहातच आजीबाईचे हरपलं भान, 70 व्या वर्षी पुलावरून थेट नदीत मारली उडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – म्हातारपण हे आपले दुसरं बालपणच असतं असं म्हणतात. लहान मुलं ज्याप्रमाणे हट्ट करतात, एखादी गोष्ट नको करू म्हटलं तर तीच आवर्जून करतात; वृद्ध व्यक्तींचंही तसंच काहीसं वागणं असतं. सध्या एका 70 वर्षांच्या आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या आजी चक्क एका पुलावरून थेट गंगा नदीत (Ganga River) उडी मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यांचा तरुणांनाही लाजवणारा जोश पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हिंदू संस्कृतीमध्ये गंगा नदीला (Ganga River) अगदी पवित्र मानलं जातं. गंगेत एकदा अंघोळ केल्याने आपली सगळी पापं धुतली जातात असा लोकांचा विश्वास आहे. हरिद्वारमध्ये गंगा नदीचं (Ganga River) पाणी अगदी स्वच्छ आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन, देवदर्शन करून मग गंगेत डुबकी घेण्याला भाविक प्राधान्य देतात. किनाऱ्यावरून गंगा नदीचं पात्र पाहूनच भाविकांच्या शरीरात नवचैतन्य निर्माण होतं. या आजींनी तर गंगेला पाहताच, किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचीही वाट पाहिली नाही. थेट पुलावरूनच त्यांनी नदीमध्ये उडी मारली.

या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कि, या आजी पुलाच्या बाजूला असलेलं ग्रिल ओलांडून पुढे येतात. एक व्यक्ती त्यांना कुठे उडी मारायची हे सांगते. त्यानंतर त्या पाण्यात उडी मारतात. हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे नाही, तर आनंदाचे भाव दिसत आहेत. अगदी उत्साहाने त्या नदीत (Ganga River) उडी मारतात, आणि आरामात पोहून किनारी पोहोचतात. आजूबाजूचे लोक हे पाहून आश्चर्य होतात आणि या आजींचे कौतुक करताना दिसत आहेत.

हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

Leave a Comment