मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार 700 इलेक्ट्रिक बसेस; प्रवास होणार आरामदायी

mumbai electric bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवासासाठी गाड्यांची संख्या वाढवणे हे गरजेचे होते. त्यामुळे मुंबईत इलेक्ट्रिक बसेस येणार याची चर्चा रंगत होती. आता त्यास पूर्ण विराम लागणार आहे. कारण आता मुंबईकरांच्या सेवेसाठी 700 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत आणि त्यामुळे बेस्टचा प्रवास आरामदायक होणार आहे. आता या बस कश्या असतील याबाबत जाणून घेऊयात.

700 बस होणार रुजू

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या बस निर्माण करणारी ई कॉसिस-मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या बसेसचा पुरवठा करण्यासाठी सक्षम ठरली नाही. त्यामुळे हा विषय मागे पडला. मात्र बेस्टने यावर्ती करावाई करण्याचा इशारा दिल्यावर कंपनी आता डबल डेकरच्या 700 इलेक्ट्रिक बस निर्माण करणार आहेत. तसेच स्विच मोबिलिटी ऑटोमेटिव्ह या कंपनीनं 200 बस पुरवण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे अश्या मिळून 900 बसेस सेवेत रुजू होणार होत्या. मात्र ई कॉसिस मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं 700 डबल डेकर बस पुरवठा करण्यास नकार दिला होता. त्यामुळे या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. मात्र आता 700 बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.

कशी असेल ही बस?

या इलेक्ट्रिक बसेस डबल डेकरच्या असणार आहेत. एका वेळेस या बसमधून तब्बल 90 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. याची ऑपरेशनल क्षमता 180 किलोमीटर एवढी आहे. मुंबईतील या इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग करण्यासाठी 80 मिनिटे लागणार आहेत. या बसेस वातानुकुलीत आहेत. त्यामुळे आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे. या बसमुळे मुंबईकरांच्या वाहतूक सुविधेमध्ये मोठी वाढ होणार आहे.