सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 702 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 830 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 287 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.82 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 831 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 14 हजार 74 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 424 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 136 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 14 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उद्यापासून सुरू
अत्यावश्यक नसलेली दुकान, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ पुर्णपणे बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट चालू ठेवण्यास परवानगी असेल.