आसाम । आसाममध्ये मुसळधार पावसाने कालपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार झाली आहे. आसाममधील २७ जिल्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामध्ये ७१ लोकांचा बळी गेला असून कितीतरी कोटींमध्ये नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून दिली गेली आहे.
आसाममधल्या पुरामध्ये ७१ लोकांना जीव गमवावा लागला आहे तर ३९ लाखांपेक्षा जास्त लोकांना या पुराचा फटका बसला आहे. हि संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. आसाम सरकारकडून ३०३ मदत केंद्र स्थापन केले आहेत. तसेच ४४५ मदत पुरवठा केंद्र स्थापन केलं आहे. तसेच ७१ मृत्यूपैकी २३ मृत्यू भूस्खलना मुळे झालेल्या आहेत. अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले होते. त्यातील काही लोकांना वाचवण्यात यश मिळाले पण २३ लोकांचा जमिनीखाली गाडले गेल्याने मृत्यू झाला. अशी माहिती आसाम आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून सांगितली आहे.
सखल क्षेत्र असलेल्या चिरांग जिल्हा हा पूर्ण पाण्याखाली गेला होता. या जिल्हातील १०० गावांना पुराचा फटका बसला आहे. २५०० लोकांना तेथे असलेल्या २० मदत केंद्रात हलवण्यात आले आहे. तर या गावातील प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला आहे. अचानक आलेल्या संकटाला जिल्हा प्रशासन यांनी चांगल्या पद्धतीने मदत पुरवली त्यामुळे या भागात कोणतीहि जीवितहानी झाली नाही. अशी माहिती आसामचे राज्यमंत्री चंदन ब्रम्हा यांनी दिली.
आसामधील दिब्रुगड जिल्यामध्ये अविरत पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आसामध्ये अनेक लहान लहान झाडे- झुडपे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तसेच खूप सारी गावे पाण्याखाली गाडली गेली आहेत. तेथे छोटी मुले , स्त्रिया , पुरुष गढूळ पाण्यातून चालताना फोटोंमध्ये दिसत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.