मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतून अनेक लोक शिर्डीला पायी प्रवास करत असतात. अनेक मंडळे शिर्डीसाठी पायी पदयात्रा काढत असतात. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या जन्मदात्या आईला खांद्यावर घेऊन पायी प्रवास करताना दिसत आहे. अनवाणी पायाने आईला डोक्यावरुन घेऊन चालणाऱ्या या श्रावणबाळाचे वय तब्बल 71 वर्ष आहे. या वयामध्ये धड काहींना चालतासुद्धा येत नाही. त्या वयात या मुलाने आपल्या 105 वर्षांच्या आईला खांद्यावर घेऊन पायी शिर्डी प्रवास सुरु केला आहे. कोपरगाव ते शिर्डी असा पायी प्रवास या मुलाने केला आहे.
https://www.instagram.com/p/CdGYyIlpxXL/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
मराठी मीम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस हा मुलगा आपल्या आईला खांद्यावर घेऊन शिर्डीसाठी जात असल्याचे दिसत आहे. कोपरगावहून शिर्डीला पायी चालत जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव बबनराव जोगदंड असे आहे. बबनरावांनी आपली आई जयाबाई यांना खांद्यावर घेतलं आणि शिर्डीची वाट धरली.
कोण आहेत बबनराव?
71 वर्षांचे बबनराव हे रिक्षा चालक आहे. 45 वर्षांपासून ते रिक्षा चालवतात. ते आतापर्यंत 18 वेळा वारीला गेले आहेत. बबनराव दरवर्षी मुंबादेवीच्या साईगाव पालखीला पायी जातात. यावेळी एकदा आईलाही घेऊन जावं, असा विचार त्यांच्या मनात नेहमी यायचा. त्यावेळी एकदा देवळात दर्शनासाठी गेले असता त्यांना आपण आईला खांद्यावर घेऊन शिर्डीला जाऊ असा निश्चय केला आणि त्यांनी हा प्रवास सुरु केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हा प्रवास सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.