हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेला लेखी उत्तर देताना मुरलीधरन म्हणाले की, “43 देश व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देतात आणि 36 देशांमध्ये भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांना ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहेत.
‘या’ देशांसाठी व्हिसा आवश्यक नाही – ज्या देशांमध्ये प्रवासासाठी व्हिसा लागत नाही असे देश आहेत – बार्बाडोस, भूतान, डोमिनिका, ग्रॅनाडा, हैती, हाँगकाँग SAR, मालदीव, मॉरिशस, मॉन्टेरॅट, नेपाळ, नियू बेटे, सामोआ, सेनेगल , त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि सर्बिया.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देणार्या देशांमध्ये इराण, इंडोनेशिया आणि म्यानमार यांचा देखील समावेश आहे तसेच श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया हे त्या 26 देशांच्या गटात आहेत जे ई-व्हिसा सुविधा देत आहेत.
भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने व्हिसा मुक्त प्रवास, व्हिसा-ऑन-अराइवल आणि ई-व्हिसा सुविधा देणार्या देशांची संख्या वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.