हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे प्रवाश्यांना सोयी सुविधा देण्यासाठी तसेच त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी मध्य रेल्वे अनेक मार्गही तयार करते. जेणेकरून तळागाळातील ठिकाणीही रेल्वे पोहचावी. त्यासाठी मध्य रेल्वेने अनेक प्रयोग हाती घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प. मध्य रेल्वेने या प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर या मार्गांवरील प्रवास हा जलद होईल अशी अशा सर्वाना होती. तीच आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. या प्रकल्पामुळे कसारा घाटातून प्रवास करणे सोयीचे होणार आहे. तसेच प्रवास हा जलद होणार आहे.
कसारा यार्ड सुधारणा प्रकल्पाचे 78% काम पूर्ण
मध्य रेल्वेने हाती घेतलेला कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प हा जवळपास 78% एवढा पूर्ण झाला आहे. या मार्गामुळे कसारा ते इगतपुरीदरम्यान असलेल्या रेल्वे गाड्यांचा वेग हा वाढणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
2024 पर्यंत पूर्ण होईल मार्ग
कसारा ते कर्जत या घाटात रोज दीडशेपेक्षा जास्त गाड्या ये- जा करतात. त्यामुळे घाटात गाडयांना तांत्रिक थांबे दिले जातात. त्यामुळे गाड्यांच्या व्यक्तशीरपणावर मोठा परिणाम होतो. त्याचप्रमाणे कसारा यार्डमधील गाड्यांची लांबी आणि रुंदी ही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे प्रवासास या गाडयांना अडचणी निर्माण होतात. तसेच केवळ याच गाड्यावर नव्हे तर मेल -एक्सप्रेसवरही याचा परिणाम होताना दिसून येतो. या परिणामामुळे प्रवाश्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. यावर्ती तोडगा म्हणून मध्य रेल्वेने कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प हाती घेतला. आता त्याचे काम अर्ध्यावर्ती पूर्ण झाले असून हा मार्ग 2024 पर्यंत सेवेसाठी खुळा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
किती आहे खर्च?
या प्रकल्पसाठी मध्य रेल्वे तब्ब्ल 19.99 कोटी रुपयाचा खर्च करणार आहे. यामध्ये फलाट क्रमांक 1 आणि 2 चे रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच डाऊन यार्डवर मार्गिका क्रमांक 1,2 तसेच 3 रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिकांची लांबी ही 844 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर अप यार्ड मार्गिका क्रमांक 4,5,6 रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिकांची लांबी वाढवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासासाठी चांगलाच फायदा होणार आहे. एवढेच नव्हे तर या प्रकल्पासाठी रस्ते उड्डाणपूल तोडून पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा मार्ग हा अधिक जलद होणार आहे. हे नक्की.