सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 790 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 407 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 8. 84 इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 195 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 96 हजार 629 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 557 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 4450 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 8 हजार 934 जणांचे नमुने घेण्यात आले. बाधितांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्याची चिंताजनक परिस्थितीत पहायला मिळत आहे.
पुणे विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 40 लाख 95 हजार 821, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 95 हजार 846, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख 34 हजार 148, सांगली जिल्हयामध्ये 8 लाख 70 हजार 573 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 84 हजार 102 नागरिकांचा समावेश आहे.