Monday, February 6, 2023

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेल्सवर कारवाई; 52 ग्राहकांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ज्यात हॉटेल्सला सायंकाळी 4 वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा देण्यास परवानगी आहे. मात्र वाळूज परिसरातील हॉटेल्सचालक नियम पायदळी तुडवत हॉटेल चालवत होते. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाळूज येथील 3 हॉटेल्सवर शनिवारी कारवाई केली आहे. यात तब्बल 52 ग्राहकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कंदील हॉटेल, मोरया हॉटेल व वसंत बार अशी कारवाई झालेल्या हॉटेल्सची नावे आहेत. हॉटेल कंदील येथून 22, मोरया येथून 12 तर वसंत बार मधील 12 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही हॉटेल्स कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचे उल्लंघन करत सुरू होत्या. यात ग्राहक बसून जेवण करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, शहरात देखील अनेक ठिकाणी अशा अवैध पद्धतीने हॉटेल्स सुरू आहेत. मात्र वाळूज परिसरातील कारवाईनंतर सर्व अवैध हॉटेल चालकाचे धाबे दणाणले आहेत. आणि त्यांनी हॉटेल्स बंद केली आहेत.