7th Pay Commission : DA मध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या खात्यात किती पैसे येणार?

DA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वतीने बुधवारी झालेल्या बैठकीत जुलै 2022 साठी DA म्हणजेच महागाई भत्यामध्ये (DA) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख निवृत्ती वेतनधारकांना सरकारने 4 टक्के महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) सध्याच्या 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाला आहे.

वर्षातून दोनदा वाढतो महागाई भत्ता
हा नियम जुलै 2022 पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता जुलैपासून कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मिळणार आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै-ऑगस्टची थकबाकीही मिळणार आहे. केंद्राकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात सप्टेंबरच्या पगाराच्या रूपात किती अतिरिक्त रुपये येतील याचे गणित समजून घेऊया…

कमाल मूळ वेतनावरील गणना
1. कर्मचार्‍यांचा मूळ पगार रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (DA) (38%) रु 21,622/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (34%) रु. 19,346/महिना
4. किती महागाई भत्ता 21,622 ने वाढला- 19,346 = रु. 2260/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

किमान मूळ वेतनावरील गणना
1. कर्मचार्‍यांचा मूळ पगार रु 18,000
2. नवीन महागाई भत्ता (DA) (38%) रु 6840/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (34%) रु. 6120/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12= रु.8640

यानुसार, कमाल मूळ वेतन 56,900 रुपये असलेल्यांच्या पगारात दरमहा 2260 रुपयांची वाढ होणार आहे . त्याचप्रमाणे, किमान मूळ वेतन 18,000 रुपये असलेल्यांच्या वेतनात मासिक आधारावर 720 रुपयांची वाढ होणार आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना सप्टेंबरचा वाढलेला पगार आणि दोन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत जास्तीत जास्त मूळ वेतन असलेल्यांच्या खात्यात 6780 रुपये जादा येतील. त्याच वेळी, ही रक्कम किमान मूळ वेतन असलेल्यांसाठी 2160 रुपये असणार आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय