हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. वास्तविक लोकसभेत केंद्र सरकारने सांगितले की,” कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता आता दिला जाणार नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की,” केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) च्या तीन हप्त्यांची थकबाकी देण्याची कोणतीही योजना सध्यातरी नाही.” चौधरी पुढे म्हणाले की,” विविध केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांकडून 18 महिन्यांचा DA आणि DR देण्याबाबत सरकारकडे अनेक अर्ज देण्यात आले आहेत.”
हे जाणून घ्या कि, कोरोना काळात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना देण्यात येणाऱ्या महागाईच्या दिलास्यावर बंदी घातली होती. याबाबत माहिती देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की,”1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी जारी करण्यात येणारा महागाई भत्ता बंद करण्याचा निर्णय कोरोना महामारीमुळे झालेल्या आर्थिक अडचणींमुळे घेण्यात आला आहे, जेणेकरून सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी होईल. सरकारने याद्वारे 34,402.32 कोटी रुपयांची बचत केली होती. 7th Pay Commission
कर्मचाऱ्यांची मागणी
पंकज चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळामध्ये सरकारला अनेक कल्याणकारी योजनांसाठी भरपूर पैशांची तरतूद करावी लागली होती. त्याचा परिणाम 2020-21 मध्ये आणि त्यानंतरही दिसून आला. याबाबत सरकारने स्पष्ट केले की, सध्या अर्थसंकल्पीय तूट FRBM कायद्यातील तरतुदींच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे, ज्यामुळे DA देण्याचा सध्यातरी कोणताही प्रस्ताव नाही. या बातमीने कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला असून, त्यांच्या थकबाकी मिळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. हे जाणून घ्या कि, केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून आपल्या थकीत DA ची रक्कम मिळण्याची वाट पाहत असून सरकारने याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जात होती. 7th Pay Commission
सप्टेंबरमध्ये वाढवला होता महागाई भत्ता
दिवाळीच्या महिनाभर आधीच केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली होती. यावेळी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA) 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के DA मिळत होता, जो आता 38 टक्के झाला आहे. केंद्र सरकार व्यतिरिक्त, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, यूपी, कर्नाटक, पंजाब आणि आसाम सरकारने देखील आपल्या कर्मचार्यांच्या भत्त्यामध्ये वाढ जाहीर केली आहे. 7th Pay Commission
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://doe.gov.in/Dearnes-Allowance
हे पण वाचा :
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ 3 प्रमुख बँका एफडीवर देत आहेत जास्त व्याज
Gold Price Today : उच्च पातळीवरील नफावसुलीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर
बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर ड्रममध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांना सीरियल किलरचा संशय