7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ग्रॅच्युइटीमध्ये होणार एवढी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

7th Pay Commission| तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल. तसेच तुमच्या कुटुंबात किंवा मित्र परिवारामध्ये कोणी सरकारी नोकरी करत असेल, तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. ही बातमी त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे सध्या आता उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या आहेत. आणि याच काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट मिळालेली आहे. सध्या देशभर लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे. देशात सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया होणार, असून त्यातील तीन टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

अशातच लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता हाच 46 टक्क्यांवरून 50% एवढा केलेला आहे. जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्क्याने महागाई भत्ता दिला होता. परंतु आता त्यांचा हा महागाई भत्ता 50% करण्यात आलेला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता महागाई भत्तासोबतच कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटी मर्यादेमध्येही वाढ करण्यात आलेली आहे. आता ही ग्रॅच्युईटी मर्यादा किती टक्के वाढवली आहे. याबद्दलची माहिती अजून समोर आलेली नाही.

मंत्रालयाने दिली माहिती | 7th Pay Commission

हाती आलेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशावरून सरकारी कर्मचाऱ्यांची ही कमाल रक्कम वाढवण्यात आलेली आहे. डीएमध्ये 50 टक्के वाढ करण्यासोबतच सरकारने ग्रॅच्युतीची मर्यादा देखील 25 टक्क्यांनी वाढवलेली आहे. याबाबत मंत्रालयाने माहिती दिलेली आहे की, 1 जानेवारी 2024 पासून सेवानिवृत्ती आणि मृत उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या 20 लाखांवरून 25 लाख एवढी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल 25 लाख रुपये एवढी ग्रॅच्युईटी मिळणार आहे.