7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 लाख 18 हजार रुपये जमा होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

7th Pay Commission । केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आणत असते. 7 व्या वेतन आयोगाचा लाभही केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळत आहे. तरीही आही गोष्टी प्रलंबित आहेत. परंतु आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी 18 महिन्याची राहिलेली DA थकबाकी रक्कम लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रलंबित DA थकबाकीची रक्कम केंद्र सरकारकडून मिळाल्यास याचा लाभ 1 कोटींहून अधिक लोकांना होण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारतर्फे दर वर्षाला 2 वेळा DA वाढवते. या DA चे दर 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू केले जातात. आता 2024 ची लोकसभा निवडणुक जवळ येत आहे. या निवडणुकीपूर्वी DA ची रक्कम मंजूर होणार असल्याचे म्हटले जात आहे.

जर केंद्र सरकारने DA ची रक्कम मंजूर केली तर केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना बूस्टर डोसप्रमाणे होणार आहे. याचा लाभ देशातील 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. आता केंद्र सरकार डीएमध्ये (7th Pay Commission) वाढ करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. केंद्र सरकारच्या मूळ वेतनात जास्त वाढ होईल, असे म्हटले जात आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा फिटमेंट फॅक्टर 2.60 पट वरून 3.0 पट वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर वाढविण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. केंद्र सरकारने याबाबत नेमके काय करणार ते सांगितलेले नाही. परंतु 1 जानेवारीला आता 13 दिवस झाले असून केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून लवकरच मोठे पॅकेज जाहीर केले जाऊ शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ देशातील जवळपास 1 कोटीहून अधिक कुटुंबांना ओणार असल्याचे म्हटले जात आहे.

DA मध्ये होणारी वाढ – 7th Pay Commission

केंद्र सरकारतर्फे DA चे दर 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू केले जातात. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये यावर्षी 4 टक्के वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर ही वाढ 50 टक्क्यांपर्यंत होऊ शकते. याचा परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊन मूळ वेटणार जास्त वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 46 टक्के डीएचा लाभ देत आहे.

केंद्र सरकारने डीएची रक्कम वाढवली तर या वाढीचे दर 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत वाच्यता केली नसली तरी फेब्रुवारी महिन्यात डीए वाढवण्याबाबत त्यांचा विचार होऊ शकतो. केंद्र सरकार 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा लाभ देणार आहे. केंद्र सरकारने सन 2020 ते 2021 पर्यंतचे डीए थकबाकीची रक्कम दिली नव्हती त्यावेळी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरनी प्रलंबित रकमेची मागणी सरकारकडे केली होती. आता जर केंद्र सरकारने प्रलंबित डीएची रक्कम दिली तर उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 लाख 18 हजार रुपये एवढी रक्कम जमा होईल आणि याचा 1 कोटींपेक्षा जास्त लोकांना लाभ होईल.