हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षी जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासकीय कर्मचार्यांसह लाखो पेन्शनधारकांची कमालीची निराशा झाली. पण आता त्यांना आणखी एक धक्का बसू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, या वेळी ट्रॅव्हल अलाऊन्स देखील वाढविला जाणार नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सच्या गणनेनुसार जुलै 2021 मध्ये कर्मचार्यांचा डीए केवळ 17 टक्के आहे, त्यामुळे यावर्षी टीए वाढणार नाही. या संदर्भात, राष्ट्रीय परिषद जेसीएम मधील स्टाफ साइडचे सचिव शिवगोपाल मिश्रा म्हणतात की, “केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा टीए हा फक्त डीए 25% किंवा त्याहून अधिक असल्यास वाढतो.
प्रवासी भत्ता म्हणून केंद्रीय कर्मचार्यांना हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचे पैसे, टॅक्सी खर्च आणि खाद्य बिले इत्यादी मिळतात. प्रवास भत्त्यामध्ये रस्ते, हवाई, रेल्वे आणि समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी दिले जाणारे भाडे देखील समाविष्ट आहे. कामानिमित्त कुठे गेल्यास हा खर्च मिळत असतो. पण ह्या वर्षी तो मिळणार नाही अशी वार्ता मीडियामध्ये होत आहे.
TA न वाढल्यामुळे कर्मचारी निराश
कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचार्यांना मिळालेला डीएचा लाभ गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून थांबविला गेला होता. पण जुलैपासून ते पुन्हा सुरू होणार होते. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उत्तरामुळे हे आणखी दृढ झाले होते. जुलैमध्ये डीएच्या वाढीसह मागील थकबाकीही देण्यात येईल, असा विश्वास होता. यामुळे विद्यमान डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढेल. परंतु काही काळापूर्वी सरकारने यावर्षी डीएमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही असे विधान केले.