हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईला वाहतूक कोंडी पासून मोकळा श्वास घेता यावा यादृष्टीकोनातून मुंबई शहरासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यासाठी परवानगी देण्यात आली त्यासाठी ऑक्टोबर 2018 पासून कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात आले आहे. आजतागायत कोस्टल रोडचे (Coastal Road) बरेचसे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबरीने साडेदहा किमी लांबीच्या या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या मार्गावर 8.5 किलोमीटर लांबीची भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत:
मुंबईला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे पावसाळ्यात मुंबईमध्ये भरतीच्या काळात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. यापासून मुंबईच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. या भिंतीमुळे सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच पुराचा धोका टळणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.महाराष्ट्रात नागरी वस्तीत प्रथमच एवढ्या लांबीची भिंत उभारली आहे. सदर भिंतीची उंची ८ ते १० फुटापर्यंत ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे कोस्टल रोडचे नुकसान कमी होऊ शकेल.
भिंत बांधणीसाठी 10 लाख खडकांचा वापर करण्यात आला:
संरक्षक भिंत बांधण्यासाठी आर्मर व कोअर रॉक असे दोन प्रकारचे खडक वापरण्यात आले असून संपूर्ण भिंत बांधणीसाठी १० लाख खडकांचा वापर करण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम करताना फोडण्यात आलेल्या डोंगरात हे दगड निघाले. त्याचा वापर कोस्टल रोडच्या भिंतीच्या कामात करण्यात आला. संरक्षक भिंतीवर जिओ टेक्स्टाईल मटेरियरल वापरण्यात आले आहे. प्रियदर्शनी पार्क ते सी लिंकच्या समुद्राच्या दिशेकडील भागापर्यंत भिंत ही संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे.
82.51% पूर्ण झाले
90.77% प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शनी पार्क
83.82% प्रियदर्शनी ते वांद्रे पॅलेस
69.46% वांद्रे पॅलेस ते सी लिंक