हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आपल्या देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अनेकांना तर शिक्षण घेऊनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. अशा बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. खरं तर काम सफाई कामगार म्हणून आहे पण पगार मात्र तब्बल ८ लाख रुपये आहे. धक्का बसला ना ?? पण होय, ऑस्ट्रेलिया मध्ये हि नोकरीची संधी असून तुम्ही देखील यासाठी अर्ज करू शकता.
ऑस्ट्रेलिया तील द टेलिग्राफ या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियात सध्या सफाई कामगारांची मोठी कमतरता आहे. त्यामुळेच तिथल्या सफाई कामगारांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. मात्र एवढ्या प्रचंड पगारानंतरही लोक काम करायला तयार नाहीत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर हाऊस किपिंगच्या कामासाठी लोकांची गरज आहे. हे काम करणाऱ्या व्यक्तीला दिवसभरात फक्त ८ तासच काम करावं लागेल आणि आठवड्यातून २ दिवस सुट्टीही मिळेल
कंपन्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा तासानुसार ठरवलं आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे वेतन पॅकेज एक कोटींवर पोहोचले आहे. म्हणजे महिन्याला तब्बल ८ लाख रुपये… तरीही शोधूनही सफाई कामगाराच्या नोकरीसाठी कोणी लवकर सापडत नाहीत. काही सफाई कंपन्या तासाला 4700 रुपये किंवा त्याहूनही अधिक रक्कम देण्यास तयार आहेत. तसेच खिडक्या आणि गटर साफ करण्यासाठी वर्षाला 82 लाख रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे.
तुम्हाला जर ही नोकरी करायची असेल तर तुम्ही सिडनी येथील अर्बन कंपनीच्या https://www.urbancompany.com/sydney या अधिकृत वेबसाईटवरून नोकरीसाठी अर्ज करू शकता.