Sunday, June 4, 2023

MBBS च्या 8 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण; अजून संख्या वाढण्याची शक्यता

सांगली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ ब-याच दिवसांपासून मंदावली असताना, पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात आज दिवसभरात 1,426 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. अशात MBBS च्या आठ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिरज शासकिय वैज्ञकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनिंना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर संपर्कातील विद्यार्थीनींची कोरोना चाचणी घेण्यात आली असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. काॅलेज परिसरातील एका कार्यक्रमामुळेच एकाच वेळी सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. पोझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थिनींना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. जानेवारीत रुग्ण संख्या वाढण्याचे संकेत टास्क फोर्सने दिले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 6 हजार 531 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 578 रुग्ण आढळून आले आहेत.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 झाली

देशातील 19 राज्यांमधील 578 जणांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. तर 151 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, या व्हेरियंटमुळं आतापर्यंत देशात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.