औरंगाबाद | औद्योगिक परिसरात जागा मिळत नसल्यामुळे वाळूज मधील 800 लघु उद्योग अडचणीत आले आहेत. जागेअभावी हे उद्योग ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू आहेत. याठिकाणी उद्योगासाठी शासनाच्या सर्व सोयी सुविधा नसल्यामुळे एनएसएमईच्या विकासाला आळा बसला असल्याची खंत मासीओचे अध्यक्ष नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे.
मासीओच्या व्यासपीठावरून लघुउद्योगाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी वीजेची सुविधा नसल्यामुळे अखंड वीजपुरवठा सुरू करण्यात यावा. यासाठी महावितरणचे देखील लक्ष वेधून घेण्यात येत आहे. उद्योगिक वसाहतीमध्ये जागा मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे उद्योग मागील वर्षापासून सुरू आहेत. कमीत कमी 400 ते 500 कोटी एवढी त्यांची उलाढाल आहे. या उद्योगासाठी कोट्यवधी रुपयांचे कर भरावे लागतात. परंतु शासनाकडून सबसिडी दिली जाते त्यापासून हे उद्योग वंचित आहेत.
याबाबत मासियाचे अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले की फक्त औद्योगिक वसाहतीत किंवा उद्योगांच्या अधिसूचित क्षेत्रात हे उद्योग नाहीत यामूळे त्यांना उद्योजकांसाठी उद्योगांसाठी सबसिडी दिली जात नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांसाठी जागा उपलब्ध नाही. आणि उपलब्ध जागेची किंमत परवडणारी नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्लॉट घेऊन हे उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांना सबसिडी देण्यासाठी शासनाने उद्योग धोरणात बदल करायला हवे असे मासीआचे अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले.