गेल्या २४ तासात ८ हजार करोना टेस्ट; महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झाली इतकी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मागच्या २४ तासात देशभरात करोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्यांच्या एकूण ८ हजार चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एका दिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

भारतात २३०१ जणांचा करोना व्हायरसची लागण झाली आहेत. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला तर १५६ जण पूर्णपणे बरे झाले. महाराष्ट्रात आणि तामिळनाडू या दोन राज्यात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ४२३ तर तामिळनाडूत ३०९ रुग्ण आहेत.

आज लॉकडाउनचा १० वा दिवस असून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. मागच्या दोन दिवसात तबलिगी जमातशी संबंधित ६४७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १४ राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित करोनाग्रस्त आढळले आहेत. आतापर्यंत ६६ हजार नागरिकांच्या करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील १८२ लॅबमध्ये करोनाच्या चाचण्यास सुरु आहेत. त्यात १३० सरकारी प्रयोगशाळा आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार