सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 803 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 816 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 9. 47 इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 462 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 95 हजार 94 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 81 हजार 523 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 409 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 23 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 8 हजार 475 जणांचे नमुने घेण्यात आले.
कोरोना बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांजवळ गेलेला आहे. उपचार्थ रूग्ण गेल्या आठवडाभरात आठ हजारांजवळ होती, ती पुन्हा 10 हजारांच्या वरती गेलेली आहे. सध्या बाधित व बरे होण्याचे प्रमाण समसमान असल्याचे पहायला मिळत आहे. बाधितांची संख्या कमी होण्याचे प्रमाण आठवडाभरात कमी झाले आहे.