भारतीय हवाई दलाचा ८८ वा वर्धापनदिन ; जाणून घेऊया काही खास गोष्टी

Indian Air Force
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज भारतीय हवाई दलाचा 88 वा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

भारतीय हवाई दलाच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी….

1) ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.

2) सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.

3) भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.

4) १९३३ पासून आत्तापर्यंत भारतीय हवाई दलाच्या ध्वजावरील आणि विमानांवर छापण्यात येणाऱ्या हवाई दलाचे बोधचिन्ह चार वेळा बदलण्यात आले आहे.

5) भारतीय हवाई दलाची एकूण ६० एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाकडे अनेक हॅलिकॉप्टर्सही आहे.

6) तझाकिस्तानमधील फर्कहोर येथेही भारतीय हवाई दलाचा एअरबेस आहे. हा कोणत्याही भारतीय सुरक्षा दलाचा देशाबाहेरील पहिला आणि एकमेव तळ आहे.

7) १९३३ पासून आत्तापर्यंत भारतीय हवाई दलाच्या ध्वजावरील आणि विमानांवर छापण्यात येणाऱ्या हवाई दलाचे बोधचिन्ह चार वेळा बदलण्यात आले आहे.

8) दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाचे एक संग्रहालय आहे. स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या हवाई दलाबद्दलच्या अनेक आठवणी या संग्रहालयाच्या माध्यमातून जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत.

9) हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी यंत्रणा असणारी विमाने अशी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय हवाई दलाकडे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’