Tuesday, June 6, 2023

…जेव्हा मॅन ऑफ द मॅच राहुल त्रिपाठीला शाहरूखशी भेट करून देतो दिनेश कार्तिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज ला 10 धावांनी पराभूत केले.राहुल त्रिपाठीची आक्रमक खेळी कोलकात्याच्या डावाच वैशिष्ट्य ठरलं.राहुल त्रिपाठीने शुबमन गिलसह डावाची सुरुवात केली आणि 51 चेंडूत 81 धावा केल्या. केकेआरला त्याच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत 167 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरादाखल, सीएसकेचा संघ २० षटकांत पाच गडी गमावून 157 धावाच करू शकला. या सामन्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिकने सामनावीर राहुलला संघाचा सह-मालक शाहरुख खानला भेटायला गेले.

कर्णधार दिनेश कार्तिकने मजेदार पद्धतीने राहुलची ओळख करून दिली. शाहरुख स्टँडमध्ये बसला होता आणि दिनेश कार्तिक आणि राहुल त्रिपाठी तिथे पोहोचले आणि मोठ्याने ओरडला, ‘शाहरुख भाई, हा नेहमीच म्हणतो, काय दिसते, काय दिसते …’ शाहरुखने राहुलला डीके यांना प्रतिसाद दिला. केकेआरचा संघ पाच सामन्यांमधून तीन विजयांसह पॉईंट टेबलमध्ये तिसर्‍या स्थानी पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’