8th pay commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 54% पर्यंत जाऊ शकतो. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के एवढा महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळत आहे परंतु आता महागाई भत्ता हा 50 टक्क्यांवरून जास्त झाला. तर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात विचार करणार आहे. असे देखील सांगण्यात आलेले आहे. परंतु याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही.
केंद्र कर्मचाऱ्यांचा (8th pay commission) सध्याचा डीए हा 50% एवढा आहे. एक जुलैपासून चार टक्क्यांनी वाढ होईल असे देखील म्हणण्यात आलेले आहे. पण जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 पाहिला तर त्या आधारे किमान चार टक्के वाढेल, असा देखील विश्वास स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्री कुमार यांनी व्यक्त केलेला आहे.
राज्यमंत्री काय म्हणाले ?
भारत पेन्शनर समाजाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती याच पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि भत्त्यामध्ये अनुमोदन दिले जात आहे. परंतु आता केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाने याबाबत कोणताही विचार केलेला नाही. असे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलेले आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी | 8th pay commission
इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे अथवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची देखील मागणी करण्यात आलेली होती. परंतु यावेळी त्यांना माजी वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींचा दाखला देण्यात आला.