हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा निवळला असला तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण की जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शिरूर पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये दौरा केला होता. या दौऱ्यामध्येच त्यांच्यावर 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात शिरूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.
जरांगेंना सभा घेणे भोवले
मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमकाची भूमिका घेतली होती. तसेच, जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. यामुळेच सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु या आरक्षणाला जरांगे पाटील यांच्याकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. सध्या जरांगे पाटील हे सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीला घेऊन दौरे आणि सभा घेताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवरच मध्यंतरी त्यांचा बीड जिल्ह्यात दौरा झाला होता. या दौऱ्या दरम्यानच त्यांच्यावर 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या गुन्हा प्रकरणात शिरूर पोलिसांनी त्यांना नोटीसही बजावली आहे. सांगितले जात आहे, जरांगे पाटील यांच्या बीड दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबी आणि क्रेनचा वापर केला होता. यामुळेच बीड पोलिसांनी जेसीबी व क्रेन चालकाला दंड ठोटावला आहे. सध्या पोलीस यापूर्वीच्या सभेत वापरण्यात आलेल्या जेसीबीची माहिती गोळा करत आहेत. याबाबत ठोस माहिती हाती लागल्यानंतरच त्यांच्याकडून पुढील कारवाई करण्यात येईल