सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरु लागली असून मंगळवारी रुग्णसंख्या घटली. नवे 901 रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हीटी दर 8.41 टक्क्यांवर खाली आला. तर 20 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 889 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 126 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 40, कडेगाव 56, खानापूर 56, पलूस 81, तासगाव 92, जत 26, कवठेमहांकाळ 29, मिरज 100, शिराळा 75 आणि वाळवा तालुक्यात 220 रुग्ण आढळले. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 4 रुग्ण आढळले.
गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचण्या 2690 पैकी 270 बधित तर 8337 अँन्टीजेन चाचणीमध्ये 658 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 901 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट 8.41 टक्क्यांपर्यंत खाली आला. जिल्ह्यातील 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 1, मिरज शहर 3, वाळवा तालुक्यातील 5, तासगाव 3, पलूस, जत, कवठेमहांकाळ प्रत्येकी 2, कडेगाव व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी पुन्हा रुग्ण वाढले. नव्याने 126 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 93 तर मिरज शहरात 33 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 40, कडेगाव 56, खानापूर 56, पलूस 81, तासगाव 92, जत 26, कवठेमहांकाळ 29, मिरज 100, शिराळा 75 आणि वाळवा तालुक्यात 220 रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 4 रुग्ण आढळला. आजपर्यंत म्युकरमायकोसीसचे 251 रुग्ण आढळून आले. तर चौदा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख 32 हजार 175 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार 777 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख 19 हजार 366 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 9 हजार 32 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 7 हजार 259 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.