हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीव सोप्प झाला असताना काही फ्रॉड लोकांकडून याच टेक्क्नॉलॉजीचा चुकीचा वापर करून लोकांना गंडा घालण्याचे काम सुरु आहे. अशावेळी भारत सरकारकडून देशातील जनतेला सातत्याने मार्गदर्शन केलं जाते आणि सतर्क केलं जाते. आताही सरकार कडून जनतेला सतर्कतेचा इशारा देत आवाहन केलं आहे कि, व्हाट्सअप वर +92 ने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल आला (+92 Number series fraud Call) तर उचलू नका. या नंबरवरून येणाऱ्या कॉलच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येतेय असं सांगण्यात आलं आहे.
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DOT) हा इशारा दिला आहे. विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यात लोकांनी असे म्हटले आहे की त्यांना व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून कॉल येत आहेत आणि कॉल करणारा सरकारी विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना तोतयागिरी करत धमकावत आहेत. तसेच तुमचा नंबर बंद करू अशी धमकी देत आहेत. सरकारने अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. त्यानुसार, जर तुमच्या मोबाईलच्या व्हाट्सअपवर +92 ने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल आला तर वेळीच सावध होऊन तो कॉल उचलू नका असं सरकारने सांगितलं आहे.
जर तुम्हाला अशा प्रकारे +92 नंबर सिरीजचा कॉल आला तर त्वरित सदर नंबर डिलीट करा. जर चुकून तुम्ही कॉल उचलला तरी तुमची वयक्तिक माहिती शेअर करू नका. काही संशयास्पद वाटल्यास तात्काळ संचार साथी वेब पोर्टलवर तक्रार करा. किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करा असा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे. कारण +92 कोड हा पाकिस्तानचा कॉल कोड आहे.