आटकेसह कराड शहरातील वाखाण परिसरात कृष्णा नदीकाठी 10 फूट लांब मगरीचे दर्शन

0
84
मगर
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात वाखाण परिसरात कृष्णा नदीकाठावर मंगळवारी 10 रोजी दुपारी 8 ते 10 फूटाच्या मगरीचे दर्शन झाले. तर आटके परिसरातील पाचवड मळी नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी गावातील एका शेतकर्‍याला मगरीचे दर्शन झाले आहे. कराड शहरासह दोन ठिकाणी मगर पहावयास मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कराड शहरातील वाखाण परिसरातील सुहास जगताप यांच्या शेतानजीक जगताप यांच्यासह शशिकांत पेटे, निलेश शिंदे यांना मंगळवारी दुपारी सुमारे 8 ते 10 फुटाची मगर नदी पात्रालगत परिसरात पहावयास मिळाली. तालुक्यातील आटके परिसरातील पाचवड मळी नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी गावातीलच एका शेतकरी युवकास मगरीचे दर्शन झाले होते. मागील आठवड्यात मालखेड गावच्या हद्दीत नदी काठावर मगर स्थानिक शेतकर्‍यांना दिसली होती.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला महापूर आला होता. हा महापुर ओसरल्यानंतर कृष्णा नदीपात्रात अनेक ठिकाणे मगरींचे दर्शन झाले आहे. सांगली येथेही कृष्णा नदीत मगरीची दर्शन झाले होते. आता कराड तालुक्यातही मगरीचे दर्शन झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कराडसह आटके येथील कृष्णा नदीकाठावर मगरीचे दर्शन झाल्याने शेतकर्‍यांना नदीकाठावरील शेतात जाताना भीती वाटत आहे. त्यामुळे तात्काळ या मगरीला पकडून अन्यत्र हलवावे, अशी मागणी रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, मालखेड, टेंभू, गोवारे, सयापूर, कोरेगाव ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here