कराड जुन्या कोयना नदीत बेपत्ता 32 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

कराड | कराड शहरातील ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पूलाजवळ बेपत्ता 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पूलाजवळ मृतदेह सापडल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदरचा मृतदेह आढळलेला व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार कालच कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील हैबुद्दीन काक शेख (वय- 32) हे दि. 1 मार्च रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर घरातील लोकांनी हैबुद्दीन यांचा नातेवाईकांनी परिसरात घेतला, मात्र मंगळवारी रात्री घरी आलाच नाही.  त्यामुळे दुसऱ्या दिवशी दि. 2 मार्च रोजी नातेवाईक सिंकदर शेख यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात हैबुद्दीन बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.

आज दि. 3 रोजी सकाळी जुन्या कोयना पुलाजवळ पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पो. हवा. एम. एम. खान, सुनिल माने करत आहेत.