व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सांगलीत शिवसेनेची राज्यपालांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी दिला. स्टेशन चौकात जिल्हा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

यावेळी लई झाल. गो बॅक कोश्यारी, या टोपी खाली चाललंय काय…., मुकुटा खाली चाललंय काय…. इतिहासात छेडछाड करणार्‍या राज्यपाल महोदयांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचा धिक्कार करण्यात आला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्राचे राजभवन हे भाजपच्या विरोधी पक्षाचे कार्यालय झाले आहे. राज्यपाल हे राज्याचे पालक नसून सरकारच्या विरोधात समांतर सरकार चालवण्याचे काम करीत असल्याची टीका सेनेच्यावतीने करण्यात आली.