एका क्षणात होत्याचे नव्हते झाले ! घरी कोणी नसताना तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा या ठिकाणी एका 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
किशोर जालमसिंग चौधरी असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो आपल्या आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा या ठिकाणी राहत होता. तसेच तो शहरातील एका दाल मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला होता. मागच्या पाच महिन्यांपासून किशोर जालमसिंग चौधरी हे घरीच होते. याचदरम्यान घरात कुणीही नसताना छताला गळफास लावून किशोर जालमसिंग चौधरी यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकलेले नाही.

घटनेच्या दिवशी दुपारी वाजताच्या सुमारास लहान भावाची पत्नी घरी आली असताना हि धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मोठ्या भावासह शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने किशोर चौधरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment