कराड | वडीलांना शेतातील कामात मदत करत असलेल्या एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. कराड तालुक्यातील किरपे या गावात सदर घटना घडली. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, किरपे ता. कराड येथे आज दि.२०.०१.२०२२ संध्याकाळी ६ वाजता धनंजय देवकर यांच्या शिवारात बिबट्याने लहान मुलावर हल्ला केला. धनंजय हे शेतीचे काम उरकून घरी येण्यासाठी निघाले असताना त्यांचे शेती अवजार साहित्य हे भरून पिशवीत ठेवत असताना त्यांचा लहान मुलगा राज धनंजय देवकर वय वर्ष ५ हा त्यांच्या जवळच खाली वाकून शेती अवजार (कैची) वडिलांना उचलून देत होता. राज अवजारं देण्यासाठी खाली वाकलेला असताना अचानक शेतातून बिबट्याने हल्ला केला व मुलाला मानेला पकडून ओडून शेतात घेऊन जाऊ लागला.
प्रसंगवधान राखत अतिशय धैर्याने वडिल धनंजय यांनी मुलाचे पाय पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले व आरडा ओरडा करु लागले. शेतालगत असलेल्या तारेचे कुपनात बिबट्या धडकल्याने त्याला मुलाला पुढे ओढता आले नाही. वडिलांचा दंगा ऐकुण बिबट्याने मुलाला सोडले.
सुदैवाने मुलगा सुटला अन् वडिलाने त्याला उचले
सदर राज देवकर ह्यास मानेला व कानाला दात जोरात लागले आहेत, तर पाठेवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. पुढील वैध्याकीय उपचारासाठी त्याला कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सहायक वनसंरक्षक महेश झांझुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव राक्ष्जक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, तसेच पोलीस पाटील किरपे हे सर्व हॉस्पिटल मध्ये उपस्थित आहेत. बिबट्या हल्या बाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.