औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच ! आजही हजारांहून अधिक रुग्णांचे निदान 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1089 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 734 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 355 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 57 हजार 792 झाली आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3668 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5712 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 381 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 310 तर ग्रामीणमधील 71 रुग्णांना सुटी देण्यात आली.

Leave a Comment