हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अशी अनेक प्राचीन स्थळे आहेत. जिथे पुरातन वास्तू सापडल्या आहेत. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेषही बऱ्याच ठिकाणी सापडत असतात. काही वर्षांपूर्वी भूगर्भात अथवा पाण्यात विलीन झालेल्या वास्तू या संशोधनातून सापडत आहेत. इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड हेरिटेज देखील अशा पद्धतीचे संशोधन करते आहे. या संस्थेच्या पुरातत्व विभागाकडून ओडिसातील महानदीच्या भागातील वास्तूंचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. या संशोधनात ४५० – ५०० वर्षापूर्वीच्या गोपीनाथ मंदिराचे शिखर नदी पात्राच्यावर आल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्राचीन मंदिराची चर्चा होते आहे.
या मंदिरात असणाऱ्या भगवान गोपीनाथ यांच्या प्रतिमांना विष्णूचे रूप मानले जात होते. या मंदिराला विष्णुमंदिरच म्हंटले जात होते. या मंदिर परिसरात सात गावे होती. म्हणून याला सत्पत्ना म्हंटले जात होते. ओडिसातील नयागढ जिल्ह्यातील पद्मावती गावात महानदीच्या पात्रात सामावलेल्या या मंदिराचे शिखर वर आले आहे. साधारण १५० वर्षांपूर्वी या परिसरात आलेल्या पुरामुळे हे मंदिर आणि परिसर नदी पात्रात बुडाला होतो. या परिसरात नदीची पातळी वाढू लागल्यावर येथील नागरिकांनी स्थलांतर केले त्यांच्यासोबत त्यांनी मंदिरातील मूर्तींचे देखील स्थलांतर केले होते. इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड हेरिटेज या संस्थेच्या पुरातत्व विभागाचे तसेच या प्रकल्पाचे सहायक दिपककुमार नायक यांनी पुरातन गोष्टींचा अभ्यास करणारे रवींद्रकुमार राणा यांच्या मदतीने या मंदिराचा शोध लावल्याचे त्यांनी सांगितले.
१५० वर्षांपूर्वीच्या पुरानंतर या मंदिराचे शिखर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पातळी कमी झाल्यावर दिसत होते. मात्र २०-२६ वर्षांपासून ते पूर्णतः दिसणे बंद झाले होते. मात्र आता या मंदिराचे शिखर पुन्हा दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या ठिकाणच्या ४ किलोमीटर परिसरात आणखी मंदिरे सापडण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले तसे संशोधन कार्य त्यांनी सुरु केले आहे. हे गोपीनाथ मंदिर ६० फूट उंचीचे आहे अशी माहिती मिळाली आहे. या मंदिर परिसरात आणखी २२ मंदिरे होती अशीही माहिती मिळाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.