महागाईचा भडका!! चिकन, मिरची अन् मॅगीच्या दरात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकीकडे खाद्यतेल आणि इंधनाच्या दरात वाढ होत असताना आता चिकन सहित मिरची, मॅगी आणि कॉफीच्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

वसई विरारमदध्ये चिकनचे दर चक्क 300 रुपये किलोवर गेले आहेत. बर्डफ्लूनंतर कोबड्यांचे उत्पादन घटल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कुक्कुटखाद्य महाग झाल्याने अंडीही महागण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात सुमारे 60 टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक अंड्यामागे सव्वा रूपये तोटा होत असल्यामुळे अंड्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे ठाण्यात मिरचीचे भाव देखील चांगलेच वाढले आहे. हिरव्या मिर्चीच्या दरांनी देखील घाऊक बाजारात शंभरी पार केली आहे. 40 ते 50 रुपये किलो मिळणारी हिरवी मिर्ची आता किरकोळ बाजारात 150 ते 160 रुपयानं विकली जात आहे. वाढत्या महागाईने सर्व सामान्य घरातील गृहिणींचे बजेट पूर्णत: कोलमडलेले दिसून येत आहे.

दोन मिनिटांत होणाऱ्या मॅगीच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. नेस्ले इंडिया कंपनीनं मॅगी महाग झाल्याची घोषणा केलीय. आता मॅगीचा 12 रुपयांचा पॅक 14 रुपयांना मिळणार आहे. मॅगीच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मॅगी महागली आहे.

Leave a Comment