हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जम्मू-कश्मीरमध्ये नुकतीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. याठिकाणी किष्टवाडवरून जम्मूकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 30 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात प्रवाशांनी भरलेली बस अचानक खोल दरीत कोसळली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या दुर्घटनेत आतापर्यंत 30 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस किष्टवाडवरून जम्मूकडे निघाली होती. परंतु प्रवासादरम्यानच बसचा अपघात झाला आहे.
डोडा बस दुर्घटना में मरने वालों की संख्या बढ़कर 36 हो गई और 19 लोग घायल हुए हैं। pic.twitter.com/PPOA9IBcnh
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2023
दरम्यान, जम्मूकडे जाणाऱ्या या बसमध्ये 50 लोक प्रवास करत होते. सांगितले जात आहे की, ही बस इतर गाड्यांशी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान बस थेट दरीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, मृतांचा आकडा वाढत जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.