Satara News : पाटण बाजार समिती निवडणुकीत पाटणकर गटाची 1 जागा बिनविरोध

Patan Market Committee News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी 18 जागांसाठी 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाकडून 29 तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या देसाई गटाकडून 31 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी हमाल, मापाडी मतदारसंघातून पाटणकर गटाच्या आनंदराव पवार यांचा केवळ एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पाटण बाजार समितीसाठी 18 जागा निवडून द्यायच्या असून 4260 इतके एकूण मतदार आहेत. बुधवार दि. 5 एप्रिलला अर्जांची छाननी तर गुरुवार, दि. 6 एप्रिल ते दि. 20 एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान व त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पाटण येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमेश उमरदंड यांनी दिली.

पाटण तालुक्यात देसाई विरुद्ध पाटकर गट असा संघर्ष यंदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने पहायला मिळत आहे. या निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिह पाटणकर विरुद्ध उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटातील उमेदवार शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत. या निवडणुकीत मतदारांच्या जुळवाजुळवीसाठी दोन्ही गटाकडून बैठका या घेतल्या जात आहेत.

सत्यजितसिह पाटणकर गटाकडून :

सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारणमधून : अमर पाटील, झुंजार पाटील, सुभाष पाटील, दत्तात्रय कदम, चंद्रशेखर मोरे, अभिजीत जाधव, दादासो जगदाळे, सुभाषराव पवार, महेंद्र मगर, महिला प्रतिनिधीमधून रेखा पाटील , लतिका साळुंखे , वंदना सावंत.

1) इतर मागासवर्ग : उत्तम कदम

2) भटक्या विमुक्त जातीतून : जगन्नाथ शेळके,

3) ग्रामपंचायत सर्वसाधारण : मोहनराव पाटील, प्रमोद देशमुख, दत्तात्रय कदम, सचिन माने, सिताराम मोरे, महेंद्र मगर

4) अनुसूचित जाती : आनंदा डुबल, उत्तम पवार.

5) आर्थिक दृष्ट्या दुर्बल : सिताराम मोरे, सचिन माने, संदीप पाटील.

6) अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी : अरविंद पाटील, बाळासो महाजन, निखिल लाहोटी,

7) हमाल व तोलारी प्रतिनिधी : आनंदराव पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तांत्रिक बाबी पूर्ततेनंतर त्यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे.

मंत्री शंभूराज देसाई गटाकडून :

1) सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारणमधून : संग्राम मोकाशी, मानसिंग चव्हाण, विकास गोडांबे, मधुकर सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सिताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, मारुती जाधव, दादासो जाधव, अमोल जगताप, रावसाहेब चव्हाण, महिला प्रतिनिधी : वैशाली शिंदे, विमल गव्हाणे, मंगल पाटील, जयश्री पवार,

2) इतर मागासवर्गातून : नितीन यादव, पांडुरंग शिरवाडकर.

3) भटक्या विमुक्त जातीमधून : धनाजी गुजर, रावसाहेब चव्हाण,

4) ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून : मनोज पाटील, राजाराम घाडगे, जोतीराम काळे, समीर भोसले,

5) अनुसूचित जातीमधून : बबन भिसे, सिद्धार्थ गायकवाड,

6) आर्थिकदृष्ट्या दुर्बलमधून : मधुकर देसाई, गोरख चव्हाण, अरुण जाधव,

7) अनुज्ञप्ती धारक व अडते प्रतिनिधीमधून : सचिन वाघडोळे, अविनाश नाझरे, अरुण जाधव यांनी अर्ज दाखल केले आहेत.