हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्तीसगड उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व प्रेमी युगलांसंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. “प्रियकराने प्रेमभंगातून जीवन संपवले तर प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही” असे ठोस मत न्यायालयाने मांडले आहे. तसेच या प्रकरणी 24 वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप प्रत्येक केला आहे.
23 जानेवारी रोजी प्रेमभंग झाल्यामुळे संबंधित तरुणाने आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या पूर्वी एक पत्र लिहून ठेवले होते ज्यामध्ये त्याने, “माझे तरुणीसोबत ८ वर्षापांसून प्रेमंबंध होते. मात्र तिने माझ्यासोबतचे संबंध तोडून दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले. तरुणीच्या भावांनी मला धमकावले आणि त्यामुळे मी जीवन संपवत आहे” असे म्हटले होते. याप्रकरणी तरुणाच्या कुटुंबीयांनी छत्तीसगडमधील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ज्यामुळे पोलिसांनी मुलीच्या दोन भावांवर आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला होता.
यानंतर जिल्हा न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी या तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 306 आणि 34 अंतर्गत लावलेले सर्व आरोप निश्चित केले होते. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांनी देखील उच्च न्यायालयात याचिका केली होती. याच याचिकेवर गेल्या दोन दिवसांपूर्वी एकल खंडपीठाचे पार्थ प्रतिम साहू यांच्यासमाेर सुनावणी झाली. यावेळी निकाल देताना, “प्रियकराने प्रेमभंगामुळे किंवा प्रेमात आलेल्या अपयशामुळे तरुणाने जीवन संपवल्यास त्यासाठी संबंधित शिक्षक किंवा संबंधित प्रेयसीला जबाबदार धरता येणार नाही” असे सांगितले. या निर्णयामुळे संबंधित प्रियसी आणि तिच्या दोन्ही भावांवरील गुन्हे मागे घेण्यात आले.