व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीवर गुन्हा दाखल

सातारा काशीळ (ता.सातारा) येथे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी बसप्पा बिराजदार (रा.काशीळ) असे संबंधिताचे नाव आहे. वैष्णवी शिवाजी बिराजदार असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी व शिवाजी यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर काही महिन्यांनी शिवाजी हा दारू पिऊन माहेरहून पैसे घेऊन ये, या कारणावरून वारंवार वैष्णवीस मारहाण करत होता. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या वेळोवेळी त्याची समजूत काढली होती. मात्र, त्याची मारहाण सुरूच होती. या छळाला कंटाळून वैष्णवीने घराच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या घटनेची फिर्याद वैष्णवीची आई माधुरी विठ्ठल बिदारी (वय- 50, रा. जालगिरी, ता. तिकोटा, विजापूर- कर्नाटक) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी शिवाजी याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले पुढील तपास करत आहेत.