Satara News : बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल 1 कोटीचे कर्ज; 49 जणांवर गुन्हा

Medha police station crime news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातबारा उताऱ्यापासून ते तलाठ्याची सही आणि शिक्का बोगस बनवून कागदपत्रे खरी असल्याचे भासवून तब्बल 1 कोटीहून अधिक रकमेचं नामांकित बँकेतून कर्ज काढत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जावळी तालुक्यातील तब्बल 49 जणांवर मेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन उत्तमराव शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब जगन्नाथ अमराळे, सचिन लक्ष्मण जाधव, सचिन बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण सोमन्ना शहाबाद (सर्व रा. आखाडे, ता. जावळी), प्रवीण शिवाजी यादव (रा. आंबेघर, ता. जावळी), कांता चंद्रकांत बेलोशे (रा. बेलोशे, ता. जावळी), महादेव चंदरराव मदने, आदिनाथ यशवंत लोहार, संगम सूर्यकांत जरे, छाया दीपक जाधव (रा. हुमगाव, ता. जावळी, जि. सातारा), संतोष शिवाजी पवार, संतोष बाळासाहेब कदम, सयाजी बाळासाहेब कदम, जयश्री सयाजी कदम (सर्व रा. कुडाळ, ता. जावळी), शिवाजी शंकर करंदर, श्रीराम शंकर करंदकर, मच्छिंद्र शंकर करंदकर (रा. रानगेघर, ता. जावळी), अक्षय भाऊसो दुर्गावळे (रा. सनपाने, ता. जावळी), दिगंबर विठ्ठल गोळे (रा. सनपाने, ता. जावळी) यांच्यासह 49 जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील कुडाळ येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार गणेश भगत (रा. कुडाळा, ता. जावळी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळच्या शाखेत कर्ज घेताना बोगस सातबारा उतारे तयार केले. त्यावर तलाठ्याची खोटी सही व शिक्का मारून हे उतारे खरे आहेत असे भासवले. कागदपत्रावरून बॅंकेने प्रत्येकाला कर्ज दिले. मात्र, त्यांनी दिलेल्या कर्जाची परफेड केली नाही. त्यावेळी बॅंकेने या सर्वांच्या कादपत्रांची पुन्हा शहानिशा केली असता सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले.

हि गोष्ट लक्षात आल्यानंतर बॅंकेच्या वतीने मेढा येथील न्यायालयात फाैजदारी खटला दाखल करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्वांनी मिळून तब्बल 1 कोटीहून अधिक रक्कम कर्ज घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आता गुन्हा दाखल झाला असून 49 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.